तांदुळवाडी किल्ला

लेखक - गौरव भावे. 
गौरव यशवंती Adventures चे संस्थापक सदस्य असून त्यांचा सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग  आहे. 

तांदुळवाडी किल्ला. एका दिवसात करता येणारा मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा किल्ला. 2016 चा मान्सून आता कुठे आपलं आगमन दर्शवत आहे. भर उन्हात करपत सुद्धा ट्रेक करणारे आम्ही पावसात सह्याद्रीला बघण्यास तर आतुरच असतो. 

रविवार ( 26 जून, 16) अगदी दोन दिवसांवर आलेला तरी काही बेत ठरत नव्हता. किल्ले बरेच पण थोडा आडवाटेचा किल्ला करायचा होता. कारण पावसात हवशे नवशे गवशे सगळे येतात मग गर्दी झाली कि नकोस वाटत. म्हणून तांदुळवाडी निवडला. 


 8 जण तयार झाले, सकाळी 5.24 ची चर्चगेट हुन सुटणारी डहाणू ट्रेन पकडणार होतो, पण ट्रेन चुकली. मग विरार लोकल मग तिथून दिव्यातून वसई मार्गे डहाणू ला जाणारी शटल ट्रेन पकडून सफाळे रॉड ला पायउतार झालो. तिथून रिक्षा पकडून 6 किलोमीटर वर असणाऱ्या तांदुळवाडी या गावात आलो, 

किल्ल्याचे नाव गावाच्या नावावरून ठेवण्यात आले असावे. 8.30 वाजता किल्ला चढायला सुरुवात केली. गडावर जाणाऱ्या 3 वाटा एक सरळ नाकावरून जाते किल्याच्या जी थोडी खडतर आहे, दुसरी किल्ल्याच्या उजव्या हाताने जाते, एक पठार उतरल्यावर लगेच डावीकडे एक वाट लागते जी महादरवाज्याला वर चढते. खर तर दरवाजा राहिलाच नाहीये आता. फक्त कोसळलेली दगडी चिरेबंदी. तिसरी वाट हि गडाच्या उजविकडूनच गडाला पूर्ण प्रदक्षिणा घालून वर जाते, गावकऱ्यांनी हि वाट पूर्ण बांधून काढली आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची कसलीही भीती नाही. आम्ही खडतर मार्गे वर चढलो, थोडी खडी चढ आहे पण लवकर पोहीचलो. तासाभरात माथ्यावर पोहोचलो. या वाटेने एक पाण्याचे टाके दिसले तिथून पुढे महादरवाज्याला येणारी वाट दिसली. अजून एक टप्पा चढल्यावर खरा गडमाथा आला. वाट संपूर्णपणे धुक्यात हरवली होती. पूर्णपणे बांधीव बालेकिल्ला, एक मंदिर आणि फुटके पाण्याचे टाके या शिवाय गडावर काही विशेष बघण्यासारखे नाही. गडामाथ्यावरून वैतरणा नदीचे विहंगम दर्शन होते. तिथून सरळ जाणारी पायवाट पकडून गावकऱ्यांनी बांधलेल्या वाटेल लागलो. ब्रेड, जॅम आणि केळ वेफर्स अस उत्तम सॅन्डविच खाल्लं. आणि सोप्प्या वाटेने खाली उतरण्यास सुरुवात केली.


छायाचित्रे -गौरव भावे  साभार 


           
तांदुळवाडीची शाळा 
तांदुळवाडीची शाळा 



धुक्यामागे लपलेला किल्ला 







बांधीव वाट



रम्य देखावा 


चौथरा

ढासळलेला दरवाज्याचा भाग 

किल्ल्यावरील मंदिर


मृग (मृगाच्या पावसात दिसणारा किडा)


Comments

Popular posts from this blog

इंद्रवज्र - Indravajra

Tryambakgad (Brahmagiri) - Harihargad. - त्र्यंबकगड (ब्रह्मगिरी) - हरिहरगड

Kalavantin Durg (कलावंतीण दुर्ग) - Way to Heaven