Posts

Showing posts from July, 2015

लोहगड - बिनचहाचा ट्रेक ..

Image
दरवाजा उघडला का ? (मी) संध्याकाळी इथे कशाला येता ?  संध्याकाळी नाही रात्री आलो . (इति तेजस) तेच ते ..  घर आहे का हे ? इथे काल "मडर" झालाय . . तुम्हाला कळत नाही का ? कोण पण येतात इकडे .दुसर्यांच्या बायका घेऊन पण येतात.  आधीच लोळत होतो. आणि हसायला लागलो. "Rolling on the floor laughing" दरवाजा उघडला का ? (मी परत) हा. उघडला.  तिकडचे सकाळी सकाळी घेऊन आलेले काका आम्हाला ओरडून गेले.  पटापट उठलो. खाली घातलेले बँनर आवरले. ७.३० वाजले होते. गडाचा दरवाजा संध्याकाळी बंद करतात. आणि सकाळी परत उघडतात. चढण्यास अतिशय सोप्पासा आणि मुंबई-पुण्याहून पोहोचण्यास अजिबात अडचण नसलेला किल्ला शिवाय नवीन ट्रेकर्स साठीचा किल्ला म्हणजे लोहगड. खरं तर लोहगड - विसापूर असे दोन्ही किल्ले करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे रात्री ८.२३ ची महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडली आणि लोणावळयाला उतरलो. ११.४५ची शेवटची लोणावळा - पुणे लोकल पकडली आणि १२ च्या आसपास लगेच येणाऱ्या मळवली स्टेशनवर उतरलो. तिथून पुलावरून द्रुतगती मार्ग पार करून सरळ लोणावळ्याच्या दिशेला चालत गेल्यावर भाजे गाव लागतं. त्याच्या अलीकडे विसा