Posts

Showing posts from 2019

इंद्रवज्र - Indravajra

Image
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शॉर्ट फिल्मची स्पर्धा असायची. त्यात भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रानवाटाचे स्वप्निल पवार आले होते. त्यांनी हरिश्चंद्र गडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दलची शॉर्ट फिल्म दाखवली आणि तेव्हा पहिल्यांदा इंद्रवज्राबद्दल कळलं. त्याआधी मी हरिश्चंद्रगडावर जाऊन आलेलो असल्याने आपण तेव्हा इंद्रवज्र बघितलं नाही याचं वाईट वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला काही काळ वेळ असते. पावसाळ्याआधी येणारे ढग कोकणकड्यावर अडकतात आणि आपल्याला हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. त्यानंतर अजून २ वेळा हरिश्चंद्र गडावर जाणं झालं. २०१६ ला मे महिन्याच्या शेवटी आणि २०१८ ला जून च्या पहिल्या आठवड्यात हरिश्चंद्र गडावर जाऊन आलो. पण दोन्ही वेळा इंद्रवज्र बघण्याचा योग काही जुळून आला नाही. पण यावेळी मात्र अधिक सकारात्मकतेने हरिश्चंद्रगडावर गेलो होतो (२४ - २५ मे). आणि रात्री कोकणकड्यावरंच मुक्काम केला. सकाळी आम्ही चौघं (मी, अवधूत, कुशल, केतन) टेन्ट मधून बाहेर येऊन सूर्य कधी तारामती शिखराच्या वरती येतोय त्याची वाट पहात बसलो. बरोब्बर ६ वाजून १८ मिनिटांनी सूर्य तारामती शिखराच्या

Anjaneri Fort (अंजनेरी गड) - महारुद्र हनुमान जन्मस्थान

Image
Trek was after almost 4 months. There were 6 members (TCS project buddies). How to go : From Mumbai 1. Go to Kasara by local 2. Take share vehicle upto Nashik old CBS (Available after every local reaching kasara throuout the day) 3. Catch ST Bus from Old CBS to Tryambakeshwar (Frequency - Half an hour. 4 AM to 10.30 PM.) 4. Reach Anjaneri Phata 3 KM before Tryambakeshwar. 5. Start trek from Phata. 6. Vehicles can go upto place where stairs for the fort start. Parking facility is available. How we went : # Took 5.32 PM Kasara local from Thane. # Travelled to Nashik Old CBS from Kasara by Share jeep. # Dinner near ST stand. # Took Last ST BUS (10.30 PM) from Nashik to Tryambakeshwar # Reached Anjaneri Phata within half an hour. Info :- One can find enough info about Anjaneri Gad on internet (Trekshitiz). But do not forget to visit 16 Jain and Hindu temples at core of Anjaneri Village. 10 persons can stay in Anjani Mata Mandir on the Platue. One can stay at top in a tent.

थरथरत्या बुबुळांपाशी ..! (भाग - २)

थरथरत्या बुबुळांपाशी ...! (भाग १) ----- (भाग - २) कसारा अँड इगतपुरी आर नोन टू बी हाँटेड. खूप आधीपासून ऐकत आलोय हे. पण या परिसरातले बरेच किल्ले केले आहेत. त्यावेळी असं कधी वाटलं नव्हतं. आम्ही बऱ्याचदा ठरवून अमावास्येला सुद्धा गेलोय पण आत्तापर्यंत त्या त्या किल्ल्यावरच्या फक्त वदंता ऐकल्या होत्या. याच्याशिवाय राजमाचीला जातानाचा चकवा, तिकडलेच गावातले रात्री मशाल घेऊन चालणारे रक्षक, तोरण्यावरचं किल्लेदाराचं भूत, मुंजा हे सारं आणि या त्रिंगलवाडी चा चकवा असे अनेक प्रकार फक्त ऐकले किंवा वाचलेच होते. ------------------------------------ पहाटे साडे पाच च्या सुमारास त्रिंगलवाडीला पोहोचलो. याआधीचा संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. इतक्या वेळाने आम्ही कोणा माणसाचं तोंड पाहिलं. जीवात जीव आला. पुढचा रस्ता विचारून घेतला आणि बराच वळसा मारून जैन लेण्यांकडे पोहोचलो. तोपर्यंत व्यवस्थित उजाडलं होतं. किल्ल्यावरून येताना पलीकडल्या गावात उतरायचं हे आधीच पक्कं केलं होतं. तसं चांदवाडीत उतरलो. तिथून अर्धा पाऊण तास चालल्यावर रिक्षा मिळाली. कालच्या विपश्यना केंद्राच्या रस्त्यावरूनच ती इगतपुरीला घेऊन जात ह

थरथरत्या बुबुळांपाशी ...! (भाग १)

थरथरत्या बुबुळांपाशी ..! (भाग - २) ----------- (भाग १) 'विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या समोरची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कातळकड्याखाली आणून सोडते.' - इति गूगल आणि गूगल मॅप्स ना साक्षी ठेवून आम्ही विपश्यना केंद्राच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो. बघतो तर काय त्या प्रवेशद्वारासमोरची सोंड गायब झाली होती. ---------------------------------------- सकाळीच दिल्ली वरून घरी आलो होतो. हिमाचलला त्रिऊंड ट्रेक करायचा राहिला म्हणून आल्या आल्या काहीतरी करायलाच हवं या इर्षेने मैत्रेय ला ट्रेक ठरवायला सांगितला. आणि त्रिंगलवाडी ला जायचं ठरलं. रात्री पावणे दहा ची दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस पकडायची होती. चक्क ठरल्याप्रमाणे साडे आठला निघालो. सव्वा नऊ पर्यंत दादरला पोहोचलो. तिकिटं काढली आणि फलाटावर गेलो. आज सारं काही अगदी विलक्षणंच वाटत होतं. गाडी लागलेलीच होती. जनरल डब्यात चढलो आणि खिडकी मिळाली. एक तर तिघांपैकी कोणालाही उशीर झाला नाही. घाई गडबड नाही. गाडी सुद्धा रिकामी. आत्तापर्यंत केलेल्या ट्रेक मध्ये इतका प्रमाणशीर प्रवास झाला नव्हता. पुढे येणाऱ्या वादळा पूर्वीची ही शांतत