इंद्रवज्र - Indravajra
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शॉर्ट फिल्मची स्पर्धा असायची. त्यात भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रानवाटाचे स्वप्निल पवार आले होते. त्यांनी हरिश्चंद्र गडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दलची शॉर्ट फिल्म दाखवली आणि तेव्हा पहिल्यांदा इंद्रवज्राबद्दल कळलं. त्याआधी मी हरिश्चंद्रगडावर जाऊन आलेलो असल्याने आपण तेव्हा इंद्रवज्र बघितलं नाही याचं वाईट वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला काही काळ वेळ असते. पावसाळ्याआधी येणारे ढग कोकणकड्यावर अडकतात आणि आपल्याला हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. त्यानंतर अजून २ वेळा हरिश्चंद्र गडावर जाणं झालं. २०१६ ला मे महिन्याच्या शेवटी आणि २०१८ ला जून च्या पहिल्या आठवड्यात हरिश्चंद्र गडावर जाऊन आलो. पण दोन्ही वेळा इंद्रवज्र बघण्याचा योग काही जुळून आला नाही. पण यावेळी मात्र अधिक सकारात्मकतेने हरिश्चंद्रगडावर गेलो होतो (२४ - २५ मे). आणि रात्री कोकणकड्यावरंच मुक्काम केला. सकाळी आम्ही चौघं (मी, अवधूत, कुशल, केतन) टेन्ट मधून बाहेर येऊन सूर्य कधी तारामती शिखराच्या वरती येतोय त्याची वाट पहात बसलो. बरोब्बर ६ वाजून १८ मिनिटांनी सूर्य तारामती शिखराच्या ...