लोहगड - बिनचहाचा ट्रेक ..
दरवाजा उघडला का ? (मी)
संध्याकाळी इथे कशाला येता ?
संध्याकाळी नाही रात्री आलो . (इति तेजस)
तेच ते .. घर आहे का हे ? इथे काल "मडर" झालाय . . तुम्हाला कळत नाही का ? कोण पण येतात इकडे .दुसर्यांच्या बायका घेऊन पण येतात.
आधीच लोळत होतो. आणि हसायला लागलो. "Rolling on the floor laughing"
दरवाजा उघडला का ? (मी परत)
हा. उघडला.
तिकडचे सकाळी सकाळी घेऊन आलेले काका आम्हाला ओरडून गेले.
पटापट उठलो. खाली घातलेले बँनर आवरले. ७.३० वाजले होते.
गडाचा दरवाजा संध्याकाळी बंद करतात. आणि सकाळी परत उघडतात. चढण्यास अतिशय सोप्पासा आणि मुंबई-पुण्याहून पोहोचण्यास अजिबात अडचण नसलेला किल्ला शिवाय नवीन ट्रेकर्स साठीचा किल्ला म्हणजे लोहगड.
खरं तर लोहगड - विसापूर असे दोन्ही किल्ले करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे रात्री ८.२३ ची महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडली आणि लोणावळयाला उतरलो.
११.४५ची शेवटची लोणावळा - पुणे लोकल पकडली आणि १२ च्या आसपास लगेच येणाऱ्या मळवली स्टेशनवर उतरलो. तिथून पुलावरून द्रुतगती मार्ग पार करून सरळ लोणावळ्याच्या दिशेला चालत गेल्यावर भाजे गाव लागतं. त्याच्या अलीकडे विसापूरला जाण्यासाठीचा रस्ता लागतो. लोहगडला जाणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा विसापूरला जाता येतं. भाजे गावाच्या जवळंच भाजे लेण्यांना जायला डावीकडे पायऱ्या आहेत. भाजे गावातूनच पुढे डांबरी रस्ता जातो तो थेट लोहगड वाडीपर्यंत.
२ वाजायच्या सुमारास लोहगड वाडीत पोहोचलो. तिकडे अडाण्यात श्वानगवय्यांनी आमचं जंगी स्वागत केलं. त्याआधी रात्री चालताना तेजस कोणत्या तरी पिक्चर ची स्टोरी सांगत होता. म्हणे 'ट्रेकिंग ला गेलेली ती मुलं परत आलीच नाहीत'. आधीच रात्री घाबरलेला मिलिंद या गोष्टीमुळे सारखा इकडे तिकडे बँटरी मारून कोणी नाही न याची चाहूल घेत होता. असंच मजल दरमजल करीत आम्ही लोहगडाच्या पायथ्यापाशी पोहोचलो. त्याआधी गायखिंडीजवळ विसापूरकडे जाणारा रस्ता दिसतो. येताना इथून जायचं असं मनाशी ठरवून पुढे निघालो. २.३० च्या आसपास लोहगड चढायला सुरुवात केली. पंधरा मिनिटात पहिल्या दरवाज्यापाशी पोहोचलो. हाच गणेश दरवाजा. पण दरवाजा बंद होता. आम्ही जरा जोर लावून, लकटून बघितलं पण दरवाजा आतून बंद केला होता. मग दरवाजा उघडेपर्यंत तिथेच वाट बघत थांबायचं ठरवलं. रात्री धुक्यात बँटरी मारून स्वतःच्या सावलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न झाला खरा पण तो निष्फळ ठरला. (कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । - आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य). मागच्या ट्रेकला मर्कट महाशयांचा छानसा अनुभव असल्याने टरकूनच होतो. हळूहळू कुंभकर्णाच्या प्रेयसीने मोहिनी घालायला सुरुवात केली. मग ४ पायऱ्या खाली येऊन बँनर अंथरलेआणि झोपलो. आधीच ते दगड ओले त्यात अर्धी चड्डी परिधान केलेले मावळे. मग काय ! व्हायचं ते झालं. थंडीने जाम वाट लावली. यशची स्लीपिंग बँग पूर्ण उघडून तिचा पायांवर पांघरूण म्हणून वापर केला. ५ जणांच्या ओढाताणीत ती फाटली नाही हे यशचं भाग्य. २ वेळा मधेच पाउस शिंपडून गेला तिसऱ्यांदा आला तेव्हा खाली जाऊन खोपटीचा आसरा घ्यायचं ठरवलं आणि परत खाली आलो. खोपटीट त्यातल्या त्यात सपाट जागा बघून तिकडे झोपलो. सकाळी सरबत, कांदाभजी, वडे विकण्यासाठी ४ बांबू लावून आडोशासाठी ज्यांनी ती जागा तयार केली त्यांचे मनोमन आभार मानले. खूप छान झोप लागली.
आमच्या अपेक्षेप्रमाणे पहाटेच दरवाजा उघडतील असं वाटलं होतं. ७ वाजून गेले तरी दरवाजा उघडण्याचा पत्ता नाही…. शेवटी ७.३० ला एक माणूस खाली येताना दिसला. तेव्हाचा तो वर वर्णन केलेला प्रसंग . .
लगेच पटापट आवरलं आणि चढायला सुरुवात केली. पहिला दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा. दरवाजातून आत गेल्यावर समोर ३ तोफा दिसतात. उजव्या बाजूला राहण्या इतपत एक खोली सुद्धा आहे. तिथेच एक शिलालेख दिसतो त्यापुढचा लागतो तो नारायण दरवाजा त्याच्या पुढचा हनुमान दरवाजा आणि शेवटचा महादरवाजा.
सर्वात शेवटच्या दरवाज्यातून आत गेल्यावर समोर एक दर्गा दिसतो. दर्ग्याच्या उजव्या बाजूला अजून एक तोफ आहे. तिकडेच पुढे ध्वजस्तंभ आहे. दर्ग्याच्या उजव्या बाजूला उंचवट्यावर महादेवाचे मंदिर आहे. दरवाज्याच्या उजवीकडच्या वाटेने चालत गेल्यावर एक पाण्याचं टाकं लागतं. अजून थोडं पुढे गेल्यावर लक्ष्मी कोठी आहे. इथेच आम्ही रात्री मुक्काम करणार होतो. पण हल्ली गडावर राहण्यास मनाई आहे.
पुढे १० मिनिटं चालत गेल्यावर विंचूकाटा दिसतो. इथे उतरून जाण्यासाठी एक दगडी भाग उतरून जावा लागतो. हा दगडी भाग उतरायच्या आधी यशने फोनवर आईला सांगितलं होता कि हा एकदम साधा ट्रेक आहे काहीच "adventurous" नाही. पण लगेचच त्याला adventure च्या प्रत्यय आला. पुढे विंचूकाट्याच्या टोकाशी जाऊन तिकडे भगवा ध्वज लावला आणि साधारण तासभर तिकडेच बसलो होतो. आमच्याकडे जे काही होतं ते खाल्लं. नाहीतरी उशिरा चढल्याने लोहगड बघून विसापूरला जाऊन येउन लोणावळ्याला दख्खनराणी पकडणं शक्य दिसत नव्हतं. म्हणून विसापूरला जाणं रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
विंचूकाट्यावरून येताना गडाच्या डाव्या बाजूने म्हणजेच विंचूकट्यावरून उजव्या बाजूने आलो. तिथे १६ कोनी बांधलेलं तळं आहे जे नाना फडणवीसांनी बांधून घेतलं होतं. तिथून अजून पुढे आल्यावर अष्टकोनी तळं लागतं. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. आणि पुढे लगेच परत आपण शिवमंदिरापाशी येउन पोहोचतो. शंकराला नमस्कार केला. आणि परत उतरायला सुरुवात केली.
मळवलीला येताना वाटेत भजे गावाजवळ एक धबधबा सदृश काहीतरी लागतं जिथे हल्ली पावसाळ्यात वर्दळ असते. पण त्याच्या
ही २० मिनिटं अलीकडे वर चढून गेल्यावर एक धबधबा आहे जिथे कोणीच नव्हतं. तिथे मनसोक्त भिजलो. आणि मग मळवलीच्या वाटेला लागलो. लोकलला जवळ जवळ पाउण तास उशीर झाल्याने आमची दाख्खनराणी चुकली. पण जरा घाईतच उद्यान एक्स्प्रेस मिळाली. परतीचा प्रवास सुरु झाला. ८.३० च्या सुमारास घरी पोहोचलो. या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एकदाही चहा प्यायलो नाही…. !

खोपटी |

गणेश दरवाजा |
शिलालेख |
३ तोफा |
नारायण दरवाजा |
महादरवाजा |
याच गडावर एअरटेलची जी जाहिरात होती त्याचं शुटींग झालं होतं. "आपली बोली आपला बाणा" ही ती अँड आणि हाच व्यू होता. |
सर्वात शेवटच्या दरवाज्यातून आत गेल्यावर समोर एक दर्गा दिसतो. दर्ग्याच्या उजव्या बाजूला अजून एक तोफ आहे. तिकडेच पुढे ध्वजस्तंभ आहे. दर्ग्याच्या उजव्या बाजूला उंचवट्यावर महादेवाचे मंदिर आहे. दरवाज्याच्या उजवीकडच्या वाटेने चालत गेल्यावर एक पाण्याचं टाकं लागतं. अजून थोडं पुढे गेल्यावर लक्ष्मी कोठी आहे. इथेच आम्ही रात्री मुक्काम करणार होतो. पण हल्ली गडावर राहण्यास मनाई आहे.
लक्ष्मी कोठी |
पुढे १० मिनिटं चालत गेल्यावर विंचूकाटा दिसतो. इथे उतरून जाण्यासाठी एक दगडी भाग उतरून जावा लागतो. हा दगडी भाग उतरायच्या आधी यशने फोनवर आईला सांगितलं होता कि हा एकदम साधा ट्रेक आहे काहीच "adventurous" नाही. पण लगेचच त्याला adventure च्या प्रत्यय आला. पुढे विंचूकाट्याच्या टोकाशी जाऊन तिकडे भगवा ध्वज लावला आणि साधारण तासभर तिकडेच बसलो होतो. आमच्याकडे जे काही होतं ते खाल्लं. नाहीतरी उशिरा चढल्याने लोहगड बघून विसापूरला जाऊन येउन लोणावळ्याला दख्खनराणी पकडणं शक्य दिसत नव्हतं. म्हणून विसापूरला जाणं रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
विंचूकाटा |
विंचूकाट्यावरून येताना गडाच्या डाव्या बाजूने म्हणजेच विंचूकट्यावरून उजव्या बाजूने आलो. तिथे १६ कोनी बांधलेलं तळं आहे जे नाना फडणवीसांनी बांधून घेतलं होतं. तिथून अजून पुढे आल्यावर अष्टकोनी तळं लागतं. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. आणि पुढे लगेच परत आपण शिवमंदिरापाशी येउन पोहोचतो. शंकराला नमस्कार केला. आणि परत उतरायला सुरुवात केली.
१६ कोनी तळं |
अष्टकोनी तळं आणि शिवमंदिर (आंतरजालातून साभार) |
मळवलीला येताना वाटेत भजे गावाजवळ एक धबधबा सदृश काहीतरी लागतं जिथे हल्ली पावसाळ्यात वर्दळ असते. पण त्याच्या
ही २० मिनिटं अलीकडे वर चढून गेल्यावर एक धबधबा आहे जिथे कोणीच नव्हतं. तिथे मनसोक्त भिजलो. आणि मग मळवलीच्या वाटेला लागलो. लोकलला जवळ जवळ पाउण तास उशीर झाल्याने आमची दाख्खनराणी चुकली. पण जरा घाईतच उद्यान एक्स्प्रेस मिळाली. परतीचा प्रवास सुरु झाला. ८.३० च्या सुमारास घरी पोहोचलो. या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एकदाही चहा प्यायलो नाही…. !
Good information about lohagad. Tahnks for sharing
ReplyDelete