पेब किल्ला - विकटगड
कलावंतीण सुळका सर झाल्यावर लगेच पुढे कुठे जायचं याचा विचार करत करत आणि ३-४ वेळा तारीख पे तारीख करत शेवटी एकदाची तारीख ठरली. ८-९ नोव्हेंबर - पेब किल्ला - विकटगड. पण २ दिवस आधी सगळेच cancel झाले आणि मी, तेजस आणि मयुर एवढेच उरलो. ३ च जण म्हणून मयुर नको म्हणत होता. पण अचानक प्लान ला कलाटणी मिळाली. अक्षय मोरे नामक सद्गृहस्थ 'जर रात्रीचा ट्रेक नसेल म्हणजेच एका दिवसात जाऊन येणार असाल तर मी येतो' या अटीवर तयार झाला. त्याच्या घरी रीतसर त्याच्या आईने माझा interview सुद्धा घेतला. आणि रात्रीचा ट्रेक असल्याशिवाय कुठेही न जाणारे आणि कोणतंही नाव न सुचल्याने स्वतःला "इकडून तिकडून अचानक भयानक ट्रेकर्स" असं नामाभिधान लावणारे आम्ही सकाळी जायला तयार झालो . असो. त्याआधी राहुल घडशी (सोमवारी परीक्षा असल्याने आला नाही ) नावाच्या त्यागी माणसाची वाक्य आठवतात - "तुम्ही रविवारीच जा माझ्यासाठी तारीख बदलू नका ". आणि मग तो दिवस उजाडला. दादर हून ६.३० ची कर्जत फास्ट लोकल पकडायची असं ठरलं. म्हणून सर्वांना ५.३० ला चर्नी रोड ला जमायला सांगितलं. आणि चक्क ५.३० ला सगळे चर्नी रोडला हजर झाल...